डीआरआयने सोमवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा वरून जेट एअरवेजच्या एका एअर होस्टेसला अटक केली. तिच्याकडून तब्बल ४ लाख ८० हजार डॉलर्स जप्त करण्यात आले. ही किंमत अंदाजे ३ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. या हवाला रॅकेटमध्ये सामील असलेल्यांना शोधण्याचे प्रयत्न डीआरआयने सुरू केले आहेत.दिल्ली-हाँगकाँग विमानातील एका एअर होस्टेसला थांबवण्यात आलं. यानंतर तिची चौकशी करण्यात आली. यावेळी सिल्व्हर फॉइलमध्ये गुंडाळलेले डॉलर्स तिच्याकडे आढळून आले. याशिवाय मेकअप बॅगमध्येही काही रक्कम सापडली. दिल्ली तील विवेक विहारमधला अमित या रॅकेटचा सूत्रधार असल्याचं चौकशीत समोर आल आहे. काळा पैसा आंतरराष्ट्रीय पातळीवर पांढरा करण्याचा गैरव्यवहार तो करत होता.५० टक्के कमिशन घेवून हे काम केले जात होते. मोठ्या कालावधी पासून मी या गैरव्यवहारात होते, असं तिने कबुल केलं. डीआरआय च्या अधिकाऱ्यांना या कारभारा ची दोन महिन्यां पूर्वीच माहिती मिळाली होती. पण योग्य आरोपी हाती लागत नव्हता. अखेर सोमवारी अचूक माहिती मिळाली आणि एअर होस्टेसला अटक झाली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews